विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर, साळवी रिंगणात

0
43

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार राजन साळवी यांचा अर्ज भरताना सुनील प्रभू, अरविंद सावंत, अशोक चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने पत्र विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांना सादर करण्यात आले आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना ३९ आमदरांनी समर्थन दिले, मात्र राजन साळवी हे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठी संधी देत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी नाव पुढे केले. आता राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे.