नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण… : देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

0
38

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात  संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. या वादावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,  राणेसाहेबांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करणार नाही,  पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत. 

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं पद आहे. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. राणेंच्या ओठात आले ते मनात होते, असे वाटत नाही.  मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरतात ते कोणाच्या मनात संताप निर्माण करू शकते. पण ते वेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकते. पण सरकार ज्या पद्धतीने वागतय ते म्हणजे गाय मारली म्हणून वासरू मारण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.