‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंचे स्पष्टीकरण

0
35

मुंबई (प्रतिनिधी) : देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिले.

सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानाबाबत यावेळी उपस्थित केला. २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचे राज्य आहे हे दिसून आले. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आले आहे, असे ते म्हणाले.

मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो, असा प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.