नारायण राणेंना अटक होणार : नाशिक पोलीस चिपळूणला रवाना

0
538

मुंबई  (प्रतिनिधी) : केंद्रीयमंत्री नारायण राणे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी  केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे नाशिक  शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे.

नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे,  समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील, असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत.