कोल्हापूर (प्रतिनिधी) : एशियन ट्रॅक टर्फ फोंडेशनतर्फे २४ ते २६ ऑगस्ट रोजी हुलहुमले बीच, मालदीव, थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅराबीच गेम्स होणार आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील सादळे-मादळे गावचे दिव्यांग खेळाडू नारायण मडके करणार आहेत.

नारायण मडके यांनी आजवर कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नागपूर, गोंदिया, औरंगाबाद, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आदी ठिकाणी जाऊन दिव्यांग स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यांनी १५ गोल्ड, १८ सिल्व्हर, २१ कांस्य पदकांची कमाई केली आहे. मडके यांना उत्कृष्ट खेळाडू, आदर्श खेळाडू, कर्ण सन्मान (बिहार राज्याचा), कोरोना योद्धा आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नारायण मडके यांना भारतीय संघात निवड झाल्यामुळे महाराष्ट्रतील प्रतिनिधी अतुल धनवडे (कोल्हापूर), प्रशांत सावंत (रत्नागिरी), सुहास मोरे (नगर) आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.