कळे (प्रतिनिधी) : नांदी फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून शालेय मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे मत सरपंच भाग्यश्री बच्चे यांनी व्यक्त केले. त्या पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली विद्यामंदीर येथील नन्ही कली कार्यक्रमावेळी बोलत होत्या. नांदी फाऊंडेशनच्या माधुरी गुरव, शिल्पा बच्चे, ग्रा.पं.सदस्य संभाजी कापडे, छाया सुतार, दिपाली पाटील आदींच्या हस्ते २९ मुलींना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.  

यावेळी माधुरी काळे, मुख्याध्यापक डी.बी.पाटील, प्रवीण कोळी, संजीवनी पाटील, वैशाली पाटील, पी.व्ही.पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, रुपाली सुतार, ज्योती गुरव, मनिषा पाटील, पालक उपस्थित होते.