नाना पटोलेंची नवी मागणी : प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लांबणीवर

0
268

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणे बाकी असताना पटोले यांनी अध्यक्षपदासोबतच कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे.  त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा लांबणीवर टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

नाना पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद आपल्याला देण्याची मागणी केली आहे. पटोले यांच्या या मागणीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी  नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद  आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी  विदर्भातील आक्रमक नेता असलेले  नाना पटोले यांची निवड निश्चित करण्यात आली होती.  परंतु आता नाना पटोले यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी  नाराजी  व्यक्त केली आहे.