मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद मागितले तर काँग्रेस त्यावेळी योग्य भूमिका घेईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मुंबईत आज (सोमवार) पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.

संजय राऊत यांनी सांगितले आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री ५ वर्ष राहणार आहे. आमच्यात सर्व चर्चा झाली होती. त्यामुळे आमचं संजय राऊत यांच्या भूमिकेला समर्थन आहे, पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल. जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवं असेल तर त्यावेळेस काँग्रेस पक्ष भूमिका घेईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

त्याचप्रमाणे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरणार आहे. जनतेनं आम्हाला जास्त जागा दिल्या तर आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, कुणाला मुख्यमंत्री करायचे. मात्र आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.