मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आज (बुधवार) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला.   

नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला होता. आज (गुरूवार) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, इतर मंत्र्याची भेट घेऊन नाना पटोले यांनी आभार मानले. त्यानंतर त्यांनी विधानसभेत जाऊन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा दिला.