भरबैठकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाना पटोले संतापले

0
26

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला विरोध केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे.   

निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर यांच्यासह आमदारांच्या  उपस्थितीत झाली. यावेळी विधानसभेची निवडणूक घेण्याची मागणी करून काँग्रेसचा उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने अध्यक्षपदाच्या निवडणूक न घेण्याची भूमिका घेतली आहे. यावर नाना पटोले यांनी संताप व्यक्त करून  राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अधिवेशनाचे केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची  शक्यता आहे.