काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

0
241

मुंबई  (प्रतिनिधी : आक्रमक नेते अशी ओळख असलेले काँग्रेस नेते व विधानसभेचे सभापती नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. परंतु त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कोण होणार  याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. प्रदेशाध्यक्ष पदासाठी  राजीव सातव, मदत व पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र,   नाना पटोले  यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सध्या पटोले विधानसभेचे सभापती आहेत. त्यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर सभापतीपदी आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.