कुरुंदवाड औद्योगिक वसाहतीचे नामकरण…

0
38

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषद मालकीच्या औद्योगिक वसाहतीस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव द्यावे. यासाठी काही संघटनामार्फत नगरपरिषदेस अर्ज देण्यात आले होते. या अर्जांचा विचार करून तसेच शाहू शताब्दी पर्वाचे औचित्य साधून औद्योगिक वसाहतीचे नामकरण छत्रपती राजर्षी शाहू महाराज औद्योगिक वसाहत असे करण्याचा निर्णय कुरुंदवाड नगरपरिषदेचे प्रशासक निखिल जाधव यांनी प्रशासकीय ठरावाद्वारे मान्यता दिली.

तसेच कृष्णा घाट येथे श्री सरसेनापती संताजी घोरपडे यांचे समाधीस्थळावर नगर परिषदेमार्फत दैनंदिन पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या अर्ज आले होते. याची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी या त्यांची समाधीवर दररोज नगर परिषदेमार्फत दैनंदिन पुष्पहार अर्पण करण्याच्या ठरावास प्रशासकीय मंजुरी दिली.