‘कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरी’च्या अध्यक्षपदी नागेंद्र राव

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नागेंद्र राव तर उपाध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे यांची निवड झाली. वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या अध्यक्षपदी पवन चांडक आणि कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी अमित पाटील यांची निवड झाली.

इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे कंपनी सेक्रेटरी घडवण्याचे काम होते. कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. यासाठी माफक फी आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष राव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोर्स केल्यानंतर विविध कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध होवू शकतात. शिवाय स्वत:चा व्यवसायही करता येते. नियमित शिक्षणासोबत बाह्य शिक्षण पध्दतीतूनही हा कोर्स करता येतो, असेही, त्यांनी स्पष्ट केले.