Categories: सातारा

माझी खुर्ची समाजासोबत : संभाजीराजे

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (बुधवारी) घेतली.

नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. तिथे ते बोलत होते. त्यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले.खासदार संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायच्या त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असेही त्यांनी म्हटले.

यावेळी संभाजीराजे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या भाषणात मी तुमचा सेवक असल्याचे सांगितले. मी छत्रपती घराण्यातील असलो, मी राजे जरी असलो तरी, मी समाजाचा सेवक असल्याचे सांगत राजर्षी शाहू महाराज खाली बसले.

या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले.

Live Marathi News

Recent Posts

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

3 hours ago

महिला दिनानिमित्त अंध भगिनींसाठी जेऊर येथे आगळा उपक्रम

पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…

4 hours ago