गडहिंग्लजमध्ये शनिवारी ‘माझा व्यवसाय – माझा हक्क’ स्वयंरोजगार मेळावा

0
116

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ‘माझा व्यवसाय-माझा हक्क’ या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ गडहिंग्लजमध्ये शनिवारी (दि.६) होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच स्वयंरोजगार मेळावा असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक व ना.  हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर डी.एम प्लाझा भगवा चौक, चर्च रोड, गडहिंग्लज येथे शनिवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कागल, गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस (छोटा हत्ती) उपलब्ध करून देण्यासाठी नाव नोंदणी होणार आहे. कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात व हसन मुश्रीफ फाउंडेशन कार्यालयात अर्ज उपलब्ध केले आहेत. अर्ज सदर करण्याची मुदत १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे, अशीही माहिती नाविद मुश्रीफ यांनी दिली आहे.