Published October 8, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका सभागृहाची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. गेले ५ वर्षे पदाधिकारी बदलाची संगीतखुर्चीच पहायला मिळाली आता तर या खेळाने टोकच गाठले आहे. कारण केवळ १ महिन्याचा कालावधीसाठी परिवहन सभापती बदलाच्या हालचाली सुरु असून येत्या १५ ऑक्टोबरनंतर हि निवड होईल असे समजते.

गेले पाच वर्षे महापालिकेने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, परिवहन सभापती सर्वच पदांची खांडोळी केली. विशेष म्हणजे कोरोनाच्या कालावधीत स्थायी सभापतीची निवडही पार पडली. महापौर निवडीला सभागृहच भरविता आले नाही नाहीतर ती हि झालीच असती. आता महापालिका सभागृहाची मुदत संपत आहे. निवडणुकीची चर्चा जोर धरत असतानाच चक्क एक महिन्यासाठी परिवहन सभापती बदलाच्या हालचाली सुरु आहेत.

गेले चार वर्ष परिवहनमध्ये कोणतीही भरीव कामगिरी झाली नव्हती. मात्र, सध्याच्या सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी अगदी कमी कालावधीत अनेक नवनवीन प्रयोग करून केमटीला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कामकाजामुळे केएमटी विभागामध्येही उर्जितावस्था आली आहे. त्यांनाही कोरोनामुळे पूर्णपणे काम करता आले नाही.

दरम्यान राजकीय हितसंबंध आणि कार्यकर्त्यांना संधी या एका निकषाला धरून पुन्हा एकदा शेवटचा महिना का असेना पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरु आहेत असे समजते. महापलिकेतील पदे ही कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी नसून ती लोकांची कामे करण्यासाठी असतात याचा विसरच नेत्यांना पडल्याचे दिसून येत आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023