मुश्रीफ उपपंतप्रधान व्हावेत : आ. पी. एन. पाटील

0
542

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे उपपंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

आ. पी. एन. पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण आले होते. ते पुढे उपपंतप्रधान झाले. आता बँकेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मुश्रीफांच्या हस्ते झाले आहे. तेही चव्हाण यांच्या प्रमाणे उपपंतप्रधान व्हावेत. दरम्यान, पाटील असे वक्तव्य करताना कार्यक्रमांच्या ठिकाणी हास्यकल्लोळ उडाला. तसेच मुश्रीफ यांनीही स्मितहास्य केले.