मुश्रीफसाहेब, दाव्यासाठी ‘व्हाईट रक्कम’ लागते, ‘ब्लॅक’ चालत नाही : चंद्रकांतदादा  

0
1305

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे नांव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप लागत नाही. त्यांनी खुशाल तक्रार करावी, मी कशाला घाबरत नाही, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज (सोमवार) एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.  

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने सुमारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला. या आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या १०० कोटींच्या दाव्यावर टीका केला. दावा लावताना २५ टक्के रक्कम न्यायालयात भरावी लागते. ती त्यांच्या खिशामध्ये आहे का ? असा सवाल करत ती व्हाईट रक्कम लागते, ब्लॅक चालत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.