कागल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने हे ठरविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला. कागल तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून यामध्ये खा. संजय मंडलिक आणि ना. हसन मुश्रीफ गटाने बाजी मारली आहे. राजे समरजीतसिंह घाटगे गटाने कौतुकास्पद एकाकी लढत दिली आहे, मात्र या गटाला म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही.

गावनिहाय निकाल पुढीलप्रमाणे – :

शेंडूर – माजी आमदार संजय घाटगे आणि ना. हसन मुश्रीफ गट दहा जागांवर विजय मिळवत सत्ता संपादन करण्यात यश मिळवले आहे. खा. संजय मंडलिक आणि राजे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

केंबळी – ना. मुश्रीफ, खा. मंडलिक आणि राजे गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. संजय घाटगे गटाला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.

बेलवळे खुर्द – महाविकासआघाडीने ४ तर राजे गटाने ३ जागांवर विजय मिळवला आहे.

बेलवळे बुद्रुक – खा. मंडलिक गट आणि ना. मुश्रीफ गटाने १० जागांवर विजय मिळवत सत्ता संपादन केली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.

साके –  मुश्रीफ गट आणि संजय घाटगे गटाने अकरा जागा जिंकून बाजी मारली आहे. राजे गटाला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.

एकोंडी – खा. मंडलिक आणि मुश्रीफ गटाने प्रत्येकी ३ तर राजे गटाने ४ जागा जिंकल्या आहेत.

व्हन्नूर –  महाविकासआघाडीने सात जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे राजे गटाला चार जागा मिळाल्या आहेत.

सुळकूड – माजी आमदार संजय घाटगे गटाला तीन, महाविकास आघाडीला ४ जागा मिळाल्या आहेत. तर ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

लिंगनूर दुमाला – महाविकास आघाडीला ८, राजे गटाला ३ जागांवर विजय मिळाला आहे.

करनूर – महाविकास आघाडीला ८, राजे गटाला २ तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.

वंदूर – महाविकास आघाडीने १० तर राजे गटाने १ जागा जिंकली आहे.

सिद्धनेर्ली – महाविकास आघाडीने ११ जागा तर राजे गटाने ४ जागा जिंकल्या आहेत.