मुरगुड विद्यालयाचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले…

0
26

मुरगुड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडमधील पाचवीचे तीन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवीचे आठ तर आठवीचे सहा विद्यार्थी आले आहेत. कागल तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीत प्रथम तर पाचवीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.