हुल्लडबाज तरुणांवर मुरगूड पोलिसांची कारवाई

0
88

कागल : मुरगूड कॉलेज व बसस्थानक परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या तरुणांवर मुरगूड पोलिसांनी कारवाई केली.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरु असून विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी होत आहे. काही टवाळखोर तरुण वेगाने वाहन चालविणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, वाहनावर नंबर प्लेट नसणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, लायसन्स नसणे या प्रकारावरून मुरगूड कॉलेज व स्टँड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या तरुणांवर मुरगूड पोलीसांनी अचानक कारवाई केली. यामध्ये अनेक तरूणांना लाठीचा प्रसाद खावा लागला. मुलींसह अनेकांना सक्त ताकीद देवून सोडण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुमार ढेरे, स्वप्नील मोरे, श्री कुंभार यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.