इचलकरंजीनजीकच्या शहापूरमध्ये युवकाचा खून….  

0
307

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी परिसर पुन्हा एकदा खुनाच्या प्रकाराने हादरला आहे. शहापूर येथील विनायक हायस्कूलजवळ एका युवकाचा आज (शुक्रवार) रात्री नऊच्या सुमारास धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. खून झालेल्या  तरुणाच्या डोक्यात, तोंडावर, मांडीवर वार करण्यात आले आहेत. मृतदेहाजवळ कोयता सापडला आहे. मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाहीये. कबनूरमधील मागाडे खून प्रकरण अद्याप ताजे असतानाच ही घटना घडली. हे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.