इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर आणि परिसरात खून आणि खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. शहरामध्ये असणाऱ्या दाते मळा येथील इराणी बिल्डिंगमध्ये काल (बुधवार) मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर  खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये प्रेमाराम चौधरी (वय 42) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी हे कापड पँकिंगचे काम करतात. या हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याची चौकशी पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी आणि गावभाग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या खुनी हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच शहरासह परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने जरब बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.