महाद्वार रोडवरील तीन यात्री निवासे पालिकेने केली सील…

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील विना परवाना व्यावसायिकधारकांवर व्यवसाय सील करण्याची मोहीम सुरु केली आहे. आज (मंगळवार) महाद्वार रोड येथील सरस्वती भक्त निवास, कलिलेश्वर यात्री निवास, कोल्हापूरची आई अंबाबाई यात्री निवास अशी तीन  विनापरवाना यात्री निवास सील करण्यात आले. ही कारवाई उपआयुक्त शिल्पा दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली, परवाना अधिक्षक राम काटकर, मंदार कुलकर्णी, रवि पोवार, विजय वाघेला, निलेश कदम व प्रसाद कराळे यांनी केली.