कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता शपथ घेतली.

मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन. मी अशीही प्रतिज्ञा करतो की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन, अशी शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहा.आयुक्त चेतन कोंडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, उपअग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, परवाना अधीक्षक राम काटकर, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.