‘आप’ लढविणार महापालिका निवडणूक : प्रदेशाध्यक्षांची घोषणा

0
176

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक आम आदमी पार्टी लढविणार असल्याची घोषणा आज (मंगळवार) प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली. कोल्हापूर महापालिकेत वर्षानुवर्षे चालत असलेला भ्रष्टाचार, ढपला संस्कृती आणि पालिकेतील बरबटलेली व्यवस्था हे सध्याचे चित्र आहे. हे चित्र बदलायचे असेल तर चांगल्या व्यक्तींनी महापालिकेत निवडून जावे लागेल. आमच्या पक्षाच्या वतीने स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राचुरे यांनी सांगितले की, आम आदमी पक्षातर्फे ही निवडणूक मुद्द्यांवर लढवली जाणार आहे. महापालिकेची निवडणूक काहींसाठी व्यवसाय झाला आहे. निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि निवडून आल्यावर ते काढून घेण्यासाठी प्रयत्न करायचे. ही पद्धत मोडीत काढण्यासाठी आमचा पक्ष जनतेतून देणग्या घेऊन निवडणूक लढवणार आहे. या वेळी त्यांनी पक्षाच्या १७ सदस्यीय समितीची घोषणा केली.

या वेळी राज्य सचिव धनंजय शिंदे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील,  प्रचार समिती सदस्य उपस्थित होते.