महापालिका निवडणूक : भाजपतर्फे समितीची घोषणा

0
298

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली.

आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी (गुरुवारी) धनंजय महाडिक व महेश जाधव यांची समिती स्थापन करून योग्य नियोजन करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक संचालन समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आज (सोमवार) सहा सदस्यांची निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजी आमदार अमल महाडिक व सुनील कदम हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. तर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सत्यजित कदम,विजय सुर्यवंशी, अशोक देसाई हे समिती सदस्य म्हणून काम पहाणार आहेत.