कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून ज्या मंगल कार्यालयांना परवानगी दिलेली आहे तिथे या नियामांचे पालन होत नाही. अशा शहरातील २७ मंगल कार्यालयांची महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तपासणी करत कारवाई केली.

यावेळी ज्या हॉल मालकांनी परवानगी घेतली नाही आणि सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही, मास्कचा वापर नाही अशा मंगल कार्यालय आणि लग्न समारंभ आयोजकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी शहरातील फुलेवाडी परिसर, आपटेनगर, कळंबा, साने गुरुजी, क्रशर चौक, नाळे कॉलनी, बेलबाग, कसबा बावडा परिसर, ताराबाई पार्क परिसर, कावळा नाका परिसर, रेल्वे गुड्स परिसर या ठिकाणी असलेल्या विविध मंगल कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी रंणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी रणजित भिसे, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.