कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीमध्ये दिवंगत  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता कर माफी योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र घरफाळा विभागामध्ये सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेअंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीतील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करातून सूट देण्याचा शासन निर्णय झाला आहे. महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र. १३५ दिनांक २६ ऑक्टोबर २०२०  ने शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.