प्रारूप मतदारयादीवरील हरकतीसाठी महापालिकेची कार्यालये सुट्टीदिवशीही सुरू राहणार…

0
47

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १६ फेब्रुवारीपासून प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी महापालिकेची गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसह मुख्य निवडणूक कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागातील नागरीकांना त्यांच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी उपलबध करुन दिली आहे. या यादीवर हरकती व सूचना १६ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दाखल करावयाची आहे.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त तसेच शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने या दिवशीही सदरची प्रभागनिहाय मतदार यादी प्रभागात, विभागीय कार्यालय क्र १ ते ४, मुख्य निवडणूक कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध्‍ असेल. त्याचबरोबर या मतदार यादीवरील हरकती आपल्या प्रभागातील संबंधित विभागीय कार्यालय क्र.१ ते ४ अंतर्गत कार्यरत असणारे उपशहर अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल करता येतील