मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

0
72

मुंबई (प्रतिनिधी) : अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांकडे दिली आहे. याप्रकऱणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

एका अज्ञात व्यक्तीने २१ डिसेंबरला महापालिकेच्या मुख्यालयात आपले खासगी सचिव यांना फोन केला. आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पेडणेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. कार्यालयाच्या लॅण्डलाईन फोनवरूनही धमकी देण्यात आली. त्यावर अर्वाच्य भाषेत समोरुन शिव्या देण्यात आल्या. या प्रकारामुळे महापालिकेच्या आवारात खळबळ उडाली आहे. याबाबत संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार देण्यास सांगितल्याचे महापौरांनी सांगितले.