इचलकरंजीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण…

0
302

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील आवळे गल्ली परिसरामध्ये महावितरण कर्मचारी आणि वीज ग्राहकांमध्ये वादावादी झाली. या परिसरामध्ये महावितरणचे कर्मचारी लाईट बील वसुली करण्यासाठी गेले होते. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये महावितरण कर्मचारी युवराज माळी यांना वीज ग्राहकांनी मारहाण केली.

या मारहाणीमध्ये युवराज माळी हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महावितरणचे कर्मचाऱ्यांनी  गावभाग पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना दमदाटी केली असल्याचा दावा करत गावभाग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. या प्रकारामुळे गावभाग पोलीस स्टेशन समोर तणावपूर्ण वातावरण झाले आहे.