सांगली फाटा येथे महावितरणने केली व्यापाऱ्यांच्या वीजेचे कनेक्शन कट…

0
440

टोप (प्रतिनिधी) : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांना चांगलाच फटका बसला होता. पैशांचे साधन नसताना व्यवसायधारकांना महावितरणकडून बील भरण्याचा आग्रह होत आहे. तर काही व्यवसायधारकांचे वीजेचे कनेक्शन परस्पर कट होत असल्याने व्यवसायधारकांची कुचंबना होत आहे.

सांगली फाटा येथील मार्बल लाईन असोसिएशनच्या व्यापाऱ्यांचे आज (मंगळवार) महावितरणने काही सूचना न देता लाईट कनेक्शन तोडल्याने तेथील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी कनेक्शन तोडण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना, लोकांकडे पैसे नसुन टप्याटप्याने भरण्यास सहकार्य करावे. यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायधारकांचे कनेक्शन कापू नका. तसेच यांच्याकडून टप्याटप्याने  ५०% रक्कम भरून घेऊन सहकार्य करावे, कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच सुरेश यादव, सरदार मुल्ला, वडगांव बाजार समिती सदस्य उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, जोतीराम पोर्लेकर, राजेंद्र सुतार, अमित शिंदे, दुकानदार, मार्बल लाईन असोसिएशन सदस्य उपस्थित होते.