एमपीएससीची परीक्षा होणार २१ मार्च रोजी…

0
138

मुंबई (प्रतिनिधी) :  एमपीएससीची परीक्षा १४ मार्चला होणार होती. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता. दरम्यान, एमपीएससी परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ मार्चला होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला म्हणजे महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल असे जाहीर केले होते की आठवडाभरात परीक्षा होईल आणि लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल. त्यानुसार आज नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.