मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मुश्रीफ यांची काम करण्याची स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी काढले. सार्वजनिक कामांच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना. मुश्रीफ यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.