महापुराने स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या सेवेसाठी खासदार संजय मंडलिक सरसावले

0
391

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील विविध परिसरातील पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर मार्केट यार्ड परिसरात करण्यात आले आहे. अशा स्थानांतरित झालेल्या सुमारे ५५०  नागरिकांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी खासदार संजय मंडलिक पुढे सरसावले आहेत. लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्ट व आयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून या पुरग्रस्त लोकांना आपत्कालीन सेवेद्वारे सर्व सुविधा देण्याचा उपक्रम आजपासून सुरू सुरु करत असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.

कोरोना महामारीच्या काळात खासदार मंडलिक यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सुमारे साडेतीन कोटीचा निधी जमा करून अद्ययावत यंत्रणा ग्रामीण भागात पुरवला होता. आता त्यापुढे जाऊन महापुरामुळे संकटात आलेल्या अनेक कुटुंबांना आपत्कालीन सेवेचा लाभ देण्यासाठी खासदार मंडलिक यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे. कोल्हापूर शहराच्या विविध भागात महापुराचे पाणी घुसल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अशा कुटुंबांचे तात्पुरते स्थानांतर मार्केट यार्ड परिसरात करण्यात आले आहे. त्यांच्या भोजन व अन्य आपत्कालीन सेवेची संपूर्ण जबाबदारी मलिक ट्रस्त आयोध्या फाऊंडेशनने आजपासून शिरावर घेतली आहे.

कोल्हापूर शहरातील सुमारे ५५०  पूरग्रस्तांचे स्थलांतर ग. गो. जाधव विद्यालय, के एम सी कॉलेज , शाहू सांस्कृतिक हॉल, प्रबुद्ध भारत हायस्कूल ,सिद्धार्थ नगर येथील डॉ आंबेडकर विद्यालय, शाहू विद्यालय तोरस्कर चौक,ज्ञानेश्वर भजनी मंडळ विठ्ठल मंदिर ,सिद्धार्थनगर बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर समाज मंदिर व लोणार वसाहत शाळा येथे करण्यात आले आहे. या सर्व लोकांच्या भोजन आणि आपत्कालीन सेवा मंडलिक ट्रस्ट व अर्ध्या फाउंडेशन यांच्या वतीने केली जात आहे.