आशा वर्कर्स, गटप्रवर्तक युनियनच्या वतीने खासदार मंडलिक यांचा सत्कार

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित विविध मागण्यांबाबत पाठपुरावा करून त्या मंजूर केल्याबद्द्ल कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने खासदार  संजय मंडलिक यांचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांबाबत  आशा स्वयंसेविकांनी लाक्षणिक संप केला होता. त्यावेळी  आशा स्वयंसेविकांचे शिष्टमंडळ खासदार मंडलिक यांना भेटून प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली होती. याची दखल घेत  खासदार मंडलिक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या सुचनेनंतर आशा स्वयंसेविकांचे प्रश्न मार्गी लागले. याबद्दल  आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी खासदार मंडलिक यांचे आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील,  जिल्हा सचिव उज्वला पाटील,  शहराध्यक्षा ज्योती तावरे आदीसह इंद्रजित पाटील उपस्थित होते.