नेते मॅनेज झाले, तरी जनता मॅनेज होणार नाही ! : खा. धैर्यशील माने

0 2,017

राधानगरी (प्रतिनिधी) : धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी लढाई सुरु असून नेते मँनेज झाले तरी जनता मँनेज होणार नाही. जनतेनेच प्रकाश आबिटकर यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. राधानगरी येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

खा. माने म्हणाले की, जिल्ह्यातील दोन्ही खासदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी असून त्यांना राज्यात पहिल्या क्रमांकाने विजयी करा. ते मतदारसंघाला राज्यात प्रथम क्रमांकावर नेतील. आम जनतेसाठी २४ तास दार उघडे असलेला आमदार अशी ओळख आ. आबिटकर यांनी निर्माण केली आहे.

खा. संजय मंडलिक म्हणाले की, आ. प्रकाश आबिटकर हे अभ्यासू आमदार असून त्यांनी विधानसभा गाजवण्याबरोबरच  मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. धनदांडग्यांच्या विरोधातील या लढाईत जनशक्ती पैशाचा ढिगारा उध्वस्त करेल.

आ. आबिटकर म्हणाले, जनतेच्या भूमिकेला आणि भावनेला न्याय देण्यासाठी, तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करण्यासाठी मी पुन्हा निवडणूक लढवित आहे. जनतेचा मला मिळत असलेला उत्स्फूर्त पाठींबा व माझ्या प्रचारातील सहभाग यातून जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदाची पोचपावती मला मिळत आहे. मी माणसातला माणूस म्हणून राहिल्यानेच जनता माझ्या पाठीशी आहे.

माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे  यांनी आ. आबिटकर यांना पाठिंबा देऊन बसस्थानकापासून भव्य रँली काढली. या रँलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तायशेटे म्हणाले की, तालुक्यातील कॉंग्रेस नेत्यांची भूमिका, पक्षीय अडचण व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होणारा त्रास या सर्वाचा विचार करून आम्ही आ. प्रकाश आबिटकर यांनाच पाठिंबा  देण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षात त्यांनी भरीव काम केले असल्याने जनता त्यांच्या समवेत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, बाबा नांदेकर, कल्याण निकम, नंदकिशोर सूर्यवंशी,  संभाजी आरडे, दीपक शिरगावकर, बाळासाहेब नवणे, सरपंच कविता शेट्टी, अरुण जाधव,  अशोक भांदिगरे, विश्वास राऊत, सुरेश चौगुले, व्ही. टी. जाधव, लहू जरग, उपसरपंच महेश अडसूळ, पप्पू पालकर, भगवान पातले,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, सुनील पताडे, सरपंच अशोक भोपळे आदी उपस्थित होते. चंद्रकांत कांबळे यांनी सूत्रसंचालन, दीपक शेट्टी यांनी आभार मानले.

 

विजयी रॅलीचा प्रत्यय…

          आ. आबिटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी २५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची रॅली काढली होती. त्याच जोशात, तेवढयाच संख्येत आज पुन्हा एकदा हजारो कार्यकर्त्यांची रॅली राधानगरी शहरामध्ये पाहावयास मिळाली. ही विजयी रॅलीच आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More