Published October 6, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भरधाव वेगात आलेल्या चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. श्रीकांत पांडूरंग पाटील (वय ४०, रा. रेसकोर्स नाका) असे जखमीचे नाव आहे. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत पाटील हे मोटारसायकलवरून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी राजारामपुरीत चालले होते. ते शाहू स्टेडियममार्गे जात असताना सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळील चौकात भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.यात श्रीकांत पाटील जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. याप्रकरणी पाटील यांनी कार चालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023