शिरोली पोलिसांकडून मोटारसायकल चोरटा चोवीस तासांत जेरबंद

0
154

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी येथील मयुरेश इंजीनियरिंग वर्क्स या कंपनी समोरील पार्किंगमधून मोटारसायकल चोरीस गेली होती. याची नोंद झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात ही चोरी उघडकीस आणण्यात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याने यश मिळवले. याप्रकरणी विशाल विठ्ठल पाटील (वय २३, रा. गुडाळ, ता. राधानगरी) याला रात्री उशिरा अटक करून चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

मयुरेश इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या समोरील पार्किंगमधून मोटारसायकल (क्र. एम एच ०९ इ वाय १५८२) चोरीस गेली होती. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विशाल पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. सपोनि किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल लोखंडे, ठाणे अंमलदार अविनाश पवार, समीर मुल्ला, सतीश जंगम, प्रशांत काटकर, महेश आंबी, सचिन पाटील यांनी तपास केला.