शिये-बावडा रस्त्यावर ऑईल पडल्यामुळे मोटरसायकलींचा अपघात…

0
829

टोप (प्रतिनिधी) : शिये ते बावडा मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या इंजिनमधून ऑईल गळती रस्त्यावरती झाली. त्यामुळे अनेक मोटरसायकली घसरून अपघात झाले. या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी होऊन मोटरसायकलीचे नुकसान झाले. ही घटना आज (रविवार) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

बावड्याहून शिये फाट्याकडे येणाऱ्या मार्गावर नाईक हॉटेलच्या समोर अज्ञात वाहनाच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती ऑईल गळती झाली. त्यामुळे  भरधाव वेगाने येणारे मोटरसायकलस्वारांची गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. यामध्ये अनेकजण किरकोळ जखमी असून मोटरसायकलींचेही नुकसान झाले. ही ऑईल गळती जवळपास ५०० मीटर अंतरापर्यंत झाली आहे. ऑईल सांडलेल्या अंतराचा विचार केला की ही गाडी मोठी असावी असा अंदाज लोकातून व्यक्त होत आहे. यावेळी काही नागरिकांनी वेळेवर दक्षता दाखवत रस्त्याची एक साईट दगड ठेवून बंद केली.