गडहिंग्लजमध्ये आई, मुलाची आत्महत्या…

0
525

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज येथील घाळी कॉलनीत राहत्या घरी आई आणि मुलाने गळफास घेतल्याची घटना काल (शुक्रवार) रात्री उघडकीस आली आहे. वैशाली आनंद कोठावळे (वय ४४) आणि अवधूत आनंद कोठावळे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे गडहिंग्लज पंचायत समितीकडील ग्रामसेवक आनंद कोठावळे यांची पत्नी आणि मुलगा आहेत. सज्ञान मुलासह आईने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक कोठावळे हे कामानिमित्त बाहेर असताना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. दोघांनी फॅनला गळफास घेतला. फोनवर संपर्क होत नसल्याने आनंद यांनी घरी येऊन पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी गडहिंग्लज पोलिसात याबाबत वर्दी दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

कोठावळे यांचे मूळ गाव कोगे (ता. करवीर) असून नोकरीनिमित्त ते गडहिंग्लज येथे राहत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळाले नसले तरी कौटुंबिक समस्येतून ही घटना घडली असल्याची शक्यता घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांमध्ये वर्तविण्यात येत होती.