बाचणी येथे विद्युत वाहिनीच्या धक्क्याने मायलेकाचा जागीच मृत्यू…

0
787

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील बाचणी येथे आज (मंगळवार) महावितरणची विद्युत वाहिनी तुटून अंगावर पडली. विजेच्या जोरदार धक्क्याने गीता गौतम जाधव (वय ३९) आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन जाधव (वय १४) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यासोबत असणारी बारा वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली आहे.

बाचणी येथे आज ओढ्यावरुन धुणे धूवून परत येत असताना गीता जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्या अंगावर विद्युतवाहिनी तुटून अंगावर पडली. यामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी महावितरणने तातडीने या कुटुंबांसाठी ४० हजारांची मदत देऊ केली आहे. आई आणि मुलाचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.