कोल्हापूर ओव्हरफुल्ल…

0
132

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शनिवार, रविवारला जोडून ख्रिसमसची सुटी आल्याने पर्यटनांनी कोल्हापूर ओव्हरफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले. पर्यटन, खरेदी आणि अंबाबाई दर्शनाला राज्य, परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. शहरातील सर्व वाहनतळ पार्किंगने भरले होते. दसरा चौकातील मैदानावरही वाहने लागली होती.

लॉकडाऊननंतर मार्केट खुले झाले आहे. शहरातील सर्वच बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. लग्नसराईही सुरू झाली आहे. छोट्या यात्राही होत आहेत. बाजारपेठेत तेजी जाणवत आहे. ख्रिसमसला जोडून वीकएंडलाच आल्याने सलग तीन दिवस सुट्टी मिळाली आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यासह परराज्यातून पर्यटक शहरात दाखल झाले आहेत. चारचाकी वाहनांनी अनेकजण आले होते. परिणामी, शहरातील सर्वच वाहनतळात वाहनांची गर्दी दिसत होती.