जळगाव (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का?, असा रोखठोक सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, पक्षाचा निर्णय सामूहिक आहे, असे समजून मी ४० वर्ष पक्षाच्या आदेशाचे पालन करत आलो. देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याचे कारण म्हणजे ते नेते होते, मुख्यमंत्री होते, दुसऱ्यांना क्लीन चिट दिली, तशी मलाही देता आली असती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना ते सांगू शकले असते की चुकीचे काम करु नका, पण त्यांनी परवानगी दिली. मला सांगितले काळजी करु नका, तीन महिन्यात मंत्रिमंडळात परत घेऊ. मी विश्वास ठेवणार आणि ते विश्वासघात करायचे असे अनेकदा व्हायचे.