गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज (शनिवार) ३६ तर काल तारखेला २१ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसात ५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, नागरिकांनी विनाकारण फिरू नये, घरीच थांबावे, असे आवाहन तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी सचिन यत्ऩाळकर यांनी केले आहे.

आज गारगोटी शहरात ११ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाठोपाठ आकुर्डे येथे ४, बामणे येथे ३, खानापूर २ तर पिंपळगांव, शेणगांव, महालवाडी,नवरसवाडी, सालपेवाडी, कूर, मडिलगे, बसरेवाडी, नाधवडे, बिडिव, कलनाकवाडी, वेंगरूळ,करंबळी, सोनारवाडी व कूर येथे प्रत्येकी १ असे एकूण ३६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर काल दिवसभरात आकुर्डे ५,  मिणचे खुर्द, शिंदेवाडी, शेणगांव या गावांमध्ये प्रत्येकी २ तर मडूर, मेघोली, महालवाडी, दारवाड, फये, म्हसवे, पाचर्डे व हणबरवाडी येथे प्रत्येकी एक असे एकूण २१ रुग्ण आढळले.

यत्नाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षात गारगोटी कोविड सेंटरसह विविध ठिकाणी ३५०४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यातून ३११५ लोक कोरोनामुक्त झाले तर सध्या तालुक्यातील २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर ९२ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.९० टक्के, तर मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. सध्या गारगोटी कोविड केअर केंद्रामध्ये १८९ जणांवर उपचार सुरु आहेत,