अंबाबाई देवीचे २३ लाखांहून भाविकांनी घेतले दर्शन

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे नवरात्रीमध्ये २३ लाख ३१ हजार ६०४ भाविकांनी दर्शन घेतले आहे.

मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये २५ लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील, अशा अंदाजाने नियोजन केले होते. देवस्थान समितीकडून ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय करण्यात आली होती. या माध्यमातून ४२ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दुसरीकडे सप्तमीला अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीकडून ७ लाख ७३ हजार ७२१ भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.