शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा…

0
16

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडून जोरदार निदर्शनं केली.

शालेय पोषण आहार योजना चालू करावी, स्वयंपाकी,मदतनीस यांच्या मानधनात तामिळनाडू राज्याप्रमाणे दरमहा ५ हजारांची वाढ करावी, शालेय पोषण आहार कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, कोव्हिड काळात ठेकेदारांना दरमहा ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, उपाध्यक्ष महादेव फुटाणे, जिल्हा सचिव अमोल नाईक, सुरेखा तेरदाळे, सह शालेय पोषण आहार कामगार सहभागी झाले होते.