शिरोळ (प्रतिनिधी) : मदतनीस स्वयंपाकींचे मानधन तत्काळ अदा करा, सर्व कामगारांना कोरोना काळातील नुकसान भरपाई द्या, शासनाच्या आदेशानुसार विहित प्रकिया न करता कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नका, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने आज (गुरुवार) शिरोळ पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक कामत यांना विविध मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१२- २०१३ सालातील इंधन फरक कमी मिळालेला आहे. तो पूर्ण अदा करण्यात यावा. केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधातील तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.  यावेळी अध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील, सेक्रेटरी अमोल नाईक, खजिनदार राजेंद्र गुंडे, उपाध्यक्ष वर्षा कुलकर्णी, महादेव फुटाणे, दिनकर पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.