इचलकरंजीमध्ये शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा…

0
71

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे आज (शुक्रवार) प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार शरद पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करीत आहे. यामुळे माल वाहतूकदार, खासगी वाहनधारक, रिक्षाचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी कोलमडली आहे. आधीच कोरोनाने नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्यात इंधन दरवाढीने देशवासियांना महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे वाढवलेले इंधन दर तत्काळ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, सयाजी चव्हाण, नगरसेवक रविंद्र माने, रविंद्र लोहार, भाऊसाहेब आवळे, मलकारी लवटे, धनाजी मोरे, महेश बोहरा, सचिन खोंद्रे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.